Talegaon Dabhade : डोळसनाथ महाराज जन्मोत्सवानिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) नगरीचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज जन्मोत्सवानिमित्त अखंड हरीनाम सप्ताह होणार आहे. या सप्ताचे आयोजन श्री डोळसनाथ महाराज मंदिर ट्रस्ट, श्री डोळसनाथ महाराज उत्सव समिती, श्री डोळसनाथ तालीम मंडळ तसेच समस्त ग्रामस्थ मंडळी तळेगाव दाभाडे यांनी केले आहे.

हा सप्ताह रविवार (दि. 28 नोव्हेंबर) ते मंगळवार (दि. 5 डिसेंबर) या कालावधीत श्री डोळसनाथ महाराज मंदिरामध्ये होणार आहे. यामध्ये पहाटे अभिषेक, महापूजा व काकड आरती सायंकाळी हरिपाठ, काळभैरवाष्टक, आरती, दीपमाळ प्रज्वलन, भजन कीर्तन आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहात अनुक्रमे आमदार सुनील शेळके,विलास काळोखे,किशोर भेगडे,संदीप सावंत,निलेश दाभाडे, छबुराव दाभाडे,सुरेंद्र पानसरे,समीर ओसवाल,आदित्य खांडगे,बिजेंद्र किल्लावाला, अशोक भेगडे,ॲड सौरभ दाभाडे, निखील भगत, गिरीश खेर, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, रणजीत काकडे यांचे हस्ते रोज महापूजा संपन्न होणार आहे.

तसेच अनुक्रमे रोज हभप जगन्नाथ महाराज म्हस्के, हभप यतिराज महाराज लोहर, हभप महावीर महाराज सुर्यवंशी, हभप बाळशिराम महाराज मिंढे, हभप सतीश महाराज काळजे, हभप गणेश महाराज कार्ले, हभप ज्ञानेश महाराज फलके, हभप मधुसूदन महाराज शास्त्री यांची कीर्तन सेवा होणार आहे.

याच बरोबर ह्या सप्ताह कालावधीत रोज मान्यवरांकडून ज्ञानदान सेवा संग्राम दत्तात्रय दाभाडे,सचिन नंदकुमार भेगडे,संकेत सतिश खळदे, श्रीशैल ज मेंथे, कै किसन काळे यांचे स्मरणार्थ महेश काळे व कै ज्ञानोबा को भेगडे स्मरणार्थ योगेश सो सातकर व मारूती ज्ञा भेगडे (सावकार), नगरसेवक अरुण जगन्नाथ भेगडे (पाटील), महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा गणेश किसनराव भेगडे देण्यात येणार आहे. (Talegaon Dabhade)

तसेच, महाप्रसादाचे आयोजन नु म वि प्र मंडळाचे सहसचिव, उद्योजक नंदकुमार आण्णासाहेब शेलार व उद्योजक सागर शिवाजीराव पवार, कै ज्ञानेश्वर वा भेगडे यांच्या स्मरणार्थ निलेश मधुकर येवले व कै सुरेश द काळोखे यांच्या स्मरणार्थ कुलदीप सुरेश काळोखे, उद्योजक अशोक ज्ञानोबा काळोखे व विनोद दादाभाऊ दाभाडे, विनोद (बंटी)अशोक भेगडे व कै विलास कृ भोर यांचे स्मरणार्थ योगेश विलास भोर, तसेच कै अर्जुन दामु दाभाडे स्मरणार्थ शंकर अर्जुन दाभाडे व राजु शंकरराव शिंदे, उद्योजक शांताराम रघुनाथ निगडकर व अमेय नितीन वाडेकर, कै किशोरभाऊ गंगाराम आवारे स्मरणार्थ उद्योजक रणजित रामदास काकडे व कै सचिनभाऊ बाळासाहेब शेळके स्मरणार्थ उद्योजक संतोषशेठ बाळासाहेब शेळके आदी मान्यवरांकडून करण्यात आले आहे.

Pune : वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जन्मोत्सवानंतर पालखीची ग्राम प्रदक्षिणा तसेच त्रिपुरी पौर्णिमेच्या (Talegaon Dabhade) दिवशी मंदिरात दीपोत्सोवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजकांनी सांगितले.

बुधवार (दि 6) मावळ दिंडी आगमनानिमित्त कै इंदुबाई उत्तम भेगडे स्मरणार्थ पुणे जिल्हा फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव उत्तम भेगडे व परिवार यांचे वतीने दिंडीस भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार (दि 7) रोजी छबीना पालखी सोहळ्यासाठी तळेगाव नगरपरिषद शिक्षण मंडळाचे सभापती राजेश पिराजी सरोदे व परिवार यांचेकडून दरवर्षी प्रमाणे रात्री 8:00 वा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहात काकडारती व भजनसाथ तळेगाव दिंडी समाज, पांडुरंग प्रासादिक भजनी मंडळ,हनुमान भजनी मंडळ, कानिफनाथ भजनी मंडळ,दत्त भजनी मंडळ आदी करणार आहेत.

या सप्ताहाचे आयोजन, नियोजन श्री डोळसनाथ महाराज मंदिर ट्रस्ट, श्री डोळसनाथ महाराज उत्सव समिती, श्री डोळसनाथ तालीम मंडळ तसेच समस्त ग्रामस्थ मंडळी तळेगा दाभाडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.