Pune : वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

एमपीसी न्यूज – जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने वाहतूक नियमांच्या ( Pune ) उल्लंघनासंदर्भात प्रलंबित असलेल्या चलन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी पोलीस उप आयुक्त, पुणे शहर वाहतूक शाखा, येरवडा येथे शनिवार (दि. 9 डिसेंबर) रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

Pimpri : चार्जिंग स्टेशनसाठी पुन्हा फेरनिविदा, ‘या’ 22 ठिकाणी उभारणार स्टेशन

या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणाचा निपटारा होण्याच्या दृष्टीने आणि वाहतूक चलनांचे तडजोडीनंतर दंडातील मिळू शकणाऱ्या सवलतींबाबतची माहिती सर्वांना मिळण्याकरिता 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत वाहतूक शाखा, येरवडा येथे मदत कक्ष (हेल्पडेस्क) सुरू करण्यात येणार आहे. या हेल्पडेस्कच्या माध्यमातून वाहतूक नियमभंग केलेल्या वाहनावर चलनांची निर्मिती तडजोडीअंती सूट देवून करण्यात येणार आहे.

सर्व संबंधितांनी 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा, बंगला क्रमांक 6, येरवडा येथे उपस्थित राहून आपापल्या प्रकरणांचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल एस. पाटील यांनी केले ( Pune ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.