BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : तळेगावात रविवारी रोटरी सिटी सायकल डे !

376
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- आरोग्य संवर्धन, वाहतुक सुरक्षा जागृती, पर्यावरण संवर्धन जागृती, स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव इ.संदेश मावळ पंचक्रोशीतील जनमानसात रुजविण्यासाठी रविवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी व रोट्रॅक्ट क्लब ऑफ तळेगाव सिटी याचे संयुक्त विद्यमाने सायकल रॅली व लकी ड्राॅचे आयोजन केले आहे.

या उपक्रमात रोटरी सिटीचे संचालक उद्योजक रो. दीपक फल्ले यांचा वाढदिवस समारंभपूर्वक साजरा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय बाळा भेगडे, रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2021च्या रो. रश्मी कुलकर्णी, अमित गोरखे, पोलीस सहआयुक्त विनायक ढाकणे, तळेगाव शहराचे मुख्याधिकारी वैभव आवारे, नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सायकल डे सकाळी साडेसात वाजता मारूती मंदिर चौक तळेगाव दाभाडे येथून सुरू होणार असून सहभागी प्रत्येकास टी शर्ट देण्यात येणार असून तीन भाग्यवंताना लकी ड्राॅ द्वारे समारंभपूर्वक सायकल वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन रोटरी सिटीचे संस्थापक अध्यक्ष रो. विलास काळोखे, अध्यक्ष रो.नितीन शहा, उपाध्यक्ष रो.मनोज ढमाले, सेक्रेटरी रो. संतोष शेळके, को. चेअरमन रो. दीपक फल्ले, रो.शरयु देवळे, समन्वयक रो.दिलीप पारेख, रोट्रक्ट अध्यक्ष केशव मोहोळ-पाटील यांनी केले आहे.

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी व रोट्रॅक्ट क्लब ऑफ तळेगाव सिटी संपूर्ण परिवार विशेष परिश्रम करीत आहे. तळेगाव शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांनी सदर रॅलीत सहभागी व्हावे व सेवाभावी उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी तर्फे करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.