Talegaon Dabhade : सतरा वर्षीय महाविद्यालयीन युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे एका सतरा वर्षीय महाविद्यालयीन युवकाने स्वयंपाक घरातील पंख्याच्या हुकाला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

आत्महत्येचा हा प्रकार मंगळवारी (दि.३०) दुपारी ३.४५च्या सुमारास उघडकीस आला.

आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. श्रेयस राजू शहरकर (वय १७,रा.अंबिका कॉर्नर, लक्ष्मीबाग कॉलनी,तळेगाव दाभाडे), असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता.

श्रेयस हा इंद्रायणी महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या ११ वीमध्ये शिकत होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश बोकेफोडे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.