Talegaon Dabhade : यशवंत नगर मध्ये स्थानिक कलाकारांची रविवारी स्वरमैफील

एमपीसी न्यूज – माजी नगरसेवक निखिल उल्हासराव भगत (Talegaon Dabhade) यांच्या वतीने आणि नागरिक मंच तळेगाव व यशवंत प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने यशवंत नगर परिसरातील स्थानिक कलाकारांची स्वरमैफिल आयोजित करण्यात आली आहे.

निखिल भगत म्हणाले, ” तिमिरातूनी तेजाकडे घेऊन जाणारा आणि निसर्गाच्या शुद्ध तत्वाची नाती सांगणारा उत्सव वाईटाचे अध:पतन करणारा व चांगल्याची कास धरणारा आहे. सूरांच्या साथीने दैनंदिन जगण्यातला अंधःकार दूर करण्यासाठी या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरीकांनी या कार्यक्रमासाठी मोठया प्रमाणावर उपस्थिती नोंदवावी-
 – नगरसेवक निखिल भगत 

त्रिपुर संध्या सुमधुर (Talegaon Dabhade) स्वरांची मैफिल या कार्यक्रमात यशवंतनगर परिसरातील स्थानिक कलाकार सादरीकरण करणार आहेत. ही स्वर मैफिल रविवारी (दि. 26) सायंकाळी सहा वाजता गोळवलकर गुरुजी क्रीडांगण (गोल ग्राउंड), यशवंत नगर, तळेगाव स्टेशन येथे होणार आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.