Pune – समृद्ध साहित्य निर्मितीसाठी भाषा वाचणे गरजेचे; डॉ शोभा जैन यांचे प्रतिपादन

एमपीसी न्यूज – आज आपली पिढी लिहायला शिकली (Pune) आहे. मात्र, आपण साहित्य प्रकारांचा अभ्यास तितकासा करत नाही. इतकेच नव्हे तर समकालीन साहित्य, आधुनिक किंवा ऐतिहासिक साहित्य देखील आपण वाचत नाही. जर आपण भाषा वाचलीच नसेल तर चांगली साहित्य निर्मिती आपण करू शकणार नाही, त्यामुळे समृद्ध साहित्य निर्मिती करण्यासाठी भाषा वाचायला हवी, असे प्रतिपादन लेखिका, समीक्षक आणि इंदौर महाविद्यालयाच्या भाषा विभागाच्या प्रमुख असलेल्या डॉ.शोभा जैन यांनी केले.

पुण्यातील दखनी अदब फाउंडेशनच्या वतीने एकाहून एक सरस कविता, गझल्स, मुलाखती, चर्चासत्रे, नाटक आणि सांगीतिक कार्यक्रम यांची रेलचेल असलेल्या चौथ्या दोन दिवसीय डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी आयोजित कार्यक्रमात डॉ जैन बोलत होत्या. जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर येथे महोत्सव संपन्न होत असून याचा आस्वाद आज पुणेकरांनी घेतला.

यावेळी डॉ सुनील देवधर यांनी ‘शब्दसंवाद – समकालीन हिंदी साहित्य’ या विषयावर डॉ शोभा जैन यांच्याशी संवाद साधला. महोत्सवाच्या मुख्य समन्वयिका मोनिका सिंग, फाउंडेशनचे जयराम कुलकर्णी, मनोज ठाकूर आदी मान्यवर कार्यक्रमावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ जैन म्हणाल्या, “जेव्हाजेव्हा साहित्याचा विषय येतो तेव्हा साहित्याचे अस्तित्व हे शब्दांवर अवलंबून आहे हे मला प्रकर्षाने जाणवते. शब्द हे भाषेला मिळालेली देण आहे, आपण शब्दांना भाषेचे प्राण म्हणू शकतो. योग्य शब्दाची निवड ही साहित्यात अत्यंत महत्त्वाची ठरते. ही निवड योग्य प्रकारे झाली तरच तर भाव मनापर्यंत पोहोचतो, असे मला वाटते.”

Talegaon Dabhade : यशवंत नगर मध्ये स्थानिक कलाकारांची रविवारी स्वरमैफील

2020-21 साली कोविड काळात आपण काही प्रमाणात शब्दांच्या जवळ आलो, असे म्हणता येईल, मात्र ही मैत्री थोड्या (Pune) काळासाठी आणि वरवरची होती असे मला वाटते. आपण अजूनही वर्णमालेतच अडकलो आहोत, असे डॉ जैन म्हणाल्या.

समकालीन साहित्य, आधुनिक साहित्य, समसामायिक आणि प्रासंगिक साहित्य यांमधला फरक आजची पिढी विसरली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. केवळ कागद उद्योगाला जिवंत ठेवण्यासाठी साहित्य रचले जात आहे की काय असा प्रश्न आजची साहित्य निर्मितीची परिस्थिती बघून मला पडतो असे त्या म्हणाल्या.

हिंदी साहित्यातील शोधप्रबंधात आज कोणालाच रुची नाही, कोणीही यावर फारसे काम करत नाही असे सांगत डॉ जैन म्हणाल्या “आज हिंदी भाषेत किती प्रबंध सादर होतात हे तपासले जायला हवे. याहीपुढे किती प्रबंध पूर्ण होतात आणि यातील किती प्रबंधांचा फायदा समाजाला होतो हे समोर यायला हवे. यामधून समाजाला आणि लिहिणाऱ्याला काय मिळते याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे.” आज चांगले साहित्य समीक्षक नाही असे परखड मत देखील त्यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे अपूर्बा यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.