Talegaon Dabhade : घरात मुले एकटे असल्याचा फायदा घेत भरदिवसा महिलेने केली चोरी

एमपीसी न्यूज : घरातील मंडळी कामानिमित्त (Talegaon Dabhade) घराबाहेर गेले असताना मुले एकटेच असल्याची संधी साधत एका अनोळखी महिलेने घरात घुसून घरातील सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केल्याची घटना तळेगाव स्टेशन परिसरात घडली. वनश्री नगर येथे गुरुवारी (दि.15) दुपारी अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. 

याप्रकरणी नंदकिशोर किशन कावळे (वय 35, रा.तळेगाव) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून एका अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् शाळेत प्रवेशोत्सव आणि विद्याव्रत ग्रहण संस्कार समारंभ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कामानिमित्त बाहेर गेले होते. तसेच घरातील फिर्यादी यांची पत्नी व भावजयी देखील मुलांना शाळेतून घरी आणायला गेल्या होत्या. यावेळी फिर्यादी यांची मुले घरात होती. दरम्यान, एक महिला घरात घुसली व तिने मुलांना आई कुठे गेली आहे? विचारले असता त्यांनी आई शाळेत (Talegaon Dabhade) गेल्याचे सांगितले.

या संधीचा फायदा घेत महिलेने घरातील 17 ग्रॅम वजनाचे 50 हजार रुपयांचे सोने चोरून नेले. भरदिवसा ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे घरात मुलांना असे घरात एकटे सोडून जाताना जरा सावधान. याबाबत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.