Talegaon Dabhade : आंबी गावातील इंद्रायणी नदीवरील पूल बनला धोकादायक

एमपीसी न्यूज – आंबी गावात इंद्रायणी नदीवर पूल बांधण्यात आला आहे. मात्र पुलाच्या दोन्ही (Talegaon Dabhade) बाजूला रस्ते न जोडल्याने तात्पुरता मुरूम टाकण्यात आला आहे. यावरून वाहन चालक जीवघेणी कसरत करीत असून हा पूल जीवघेणा ठरू लागला आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन महिन्यांपूर्वी अवघ्या दहा दिवसात हा पूल वाहतुकीसाठी सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले होते.

मौजे आंबी तालुका मावळ येथील इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम अपूर्ण असून पुलाचे जोडरस्ते अर्धवट आहेत.दोन्ही बाजूला मुरुम टाकून सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलीही सुरक्षा व्यवस्था न करता, कोणतेही सूचना दर्शक फलक न लावल्याने काही अतिशहाणे वाहनचालक आपली कला दाखवून जीवितास धोका निर्माण करत आहेत. धोकादायक पुलावरील धोकादायक वाहतूक चालू असून संबंधित प्रशासन मात्र जीव जायची वाट पहात आहेत का ?अशी विचारणा स्थनिक नागरिक करत आहेत.

Mahaveer jayanti special : भगवान महावीरांच्या विचारांची उपयुक्तता

छायाचित्रात जीवाशी खेळ करताना टेम्पो चालक आणि दुचाकीस्वार.. त्यात चढावर टेम्पो मुरुमात अडकल्याने पलटी होत असताना  जेसीबीने मागून टेम्पोला धक्का देऊन टेम्पो काढण्यात आला.सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर योग्य त्या सुरक्षा यंत्रणा वापरून कार्यवाही करावी. पुलाचे जोडरस्ते होईपर्यंत दोन्ही बाजूने वाहने येऊ नयेत यासाठी बरीकॅड किंवा चोवीस तास सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी.

तळेगांव दाभाडेहद्दीत व एमआयडीसी सर्कल या दोन्ही ठिकाणी सुरक्षित उपाय योजना कराव्यात. लोकप्रतिनिधी (Talegaon Dabhade) आणि गाव कारभारी यांनी मिळून यावर निर्बंध घालून संभाव्य बळी थांबवावेत.दोन तीन किरकोळ अपघात या ठिकाणी झाले असून मोठ्या अपघाताची वाट पाहू नये.तीन महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने दहा दिवसांत हा रस्ता खुला करू हे आश्वासन देऊनही हे काम जैसे थे आहे. पावसाळ्यापूर्वी हे जोडरस्ते पूर्ण करावेत ही गावकरी आणि आजू बाजुच्या गावकऱ्यांची मागणी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.