Talegaon Dabhade : समाजात वावरताना दुराग्रहीपणा नसावा – गुलाबराव महाराज खालकर

एमपीसी न्यूज – एखाद्या विषयी दोष न देता, सत्य जाणून बोलावे. सत्य न जाणता ( Talegaon Dabhade)  एखाद्या विषयी उगीचच दुराग्रह ठेवून समाजात वागू नये. समाजात दुसऱ्यांच्या कल्याणाकरीता जे कोणी कार्य करतात ती लोकं वरवर पाहता कठोर दिसतात; मात्र त्यांच्या अंत:करणात जगाच्या कल्याणाचा मानस असतो. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे राजा दशरथ यांच्या पत्नी कैकयी या आहेत असे सांगत कौसल्येने रामास जन्म दिला परंतु रामराज्याची जगाला मिळालेली देणगी ही केवळ माता कैकयी यांच्यामुळेच असल्याचे परखड मत हभप गुलाबराव महाराज खालकर यांनी व्यक्त केले.

मावळ तालुक्यातील वराळे येथे हभप शंकर महाराज मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा हभप गुलाबराव महाराज खालकर यांनी सादर केली. त्यावेळी ते बोलत होते. खालकर महाराज यांनी दुर्बुद्धी ते मना l कदा नूपजो नारायणा  ll आता मज ऐसे करी l तुझे पाय चित्ती धरी ll हा संत तुकाराम महाराज यांचा मागणीपर प्रकरणातील अभंग कीर्तनसेवेसाठी घेतला होता.

Pune : पुणे शहरात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जागृतीवर भर द्या – डॉ. राजेंद्र भोसले

अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष हभप नंदकुमार भसे,हभप गणेश मोहिते,नामदेव ननावरे,सोपान साठे,नंदकुमार शेटे,हभप सितारामबुवा मराठे,बबन मराठे,मा जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे,मा सरपंच काळुराम मराठे,ज्ञानेश्वर मराठे, शहाजी मराठे,बबनराव उध्दव मराठे, अतुल मराठे,अरुण मराठे,दिपक महाराज वारींगे, सुनिल शिंदे,दत्तात्रय वारींगे,तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य,ग्रामस्थ व माता -भगिनी,वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना खालकर महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील भाव व्यक्त करताना मनात उत्पन्न होणारी वाईट भक्ती पांडुरंगा तुझ्या कृपेने नष्ट होऊदे आणि माझ्या चित्तात सुद्धा मी पांडुरंगाचे चरण धरावे इतकाच लाभ मला मिळूदे या तुकोबारायांच्या भावना व्यक्त करताना रामायणातील माता कैकेयी आणि सुमित्रा यांचे उदाहरण देत कौसल्या मातेने श्रीरामाला जन्म दिला व जग दाखवले; मात्र कैकेयी मातेने श्रीरामाला जन्म दिला नसला तरी जगाला श्रीराम दाखवला. कैकयी नसती तर रामराज्य झालेच नसते असे सांगितले.

यावेळी रामायण,महाभारत, भागवतातील अनेक दृष्टांत कथन करीत दुर्गुणांनी युक्त व्यक्तीचे शिरस्त्राण आपण कधीही आपल्या डोक्यावर पांघरू नये हे सांगताना राजा परीक्षित यांनी जरासंधाचा मुकूट मस्तकी धारण केल्यानंतर त्यांना भोगावा लागलेला त्रास सर्वश्रुत आसल्याचे सांगीतले.

कैकयी माता या अत्यंत बुद्धिमान, दुस-यांचे कल्याण चिंतणाऱ्या असूनही आज समाजात ‘कैकयी’ ‌या नावाबद्दल साशंकता व दुराग्रही भावना आहेत. आज आई वडील आपल्या मुलींची नावे कैकयी ठेवायला धजावत नाही ही मोठी शोकांतिका आहे,असे खालकर महाराजांनी स्पष्ट केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाळासाहेब मराठे,गणेश मराठे,माऊली मराठे, प्रभाकर मराठे,तानाजी मराठे,शंकर निवृत्ती मराठे,गणपत मराठे,दिनेश मराठे अनिल शांताराम मराठे,सुरेश मराठे, दत्तात्रय मराठे, अशोक शंकर मराठे पुजारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे स्वागत, सूत्रसंचालन हभप सितारामबुवा मराठे व बाळासाहेब मराठे यांनी ( Talegaon Dabhade) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.