Talegaon : कर्ज मंजूर करून देतो म्हणून महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज – कर्ज मंजूर करुन देतो म्हणून महिलेची (Talegaon) फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही फसवणूक 29 जानोवारी ते 30 जानेवारी 2024 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तळेगाव दाभाडे पोलिसांनी आदर्श वर्मा (पुर्ण नाव माहिती नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Chikhali : ट्रेलरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना बजाज फायनान्ससचे अडीच (Talegaon) लाखांचे कर्ज मिळवून देतो असे आमिष आरोपीने दाखवले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी यांच्याकडून 5 हजार 181 रुपये घेत फसवणूक केली आहे. यावरून तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.