Talegaon : प्रभारी तहसिलदार सुनंदा भोसले यांनी जनजागृतीसाठी स्वत:च्या मुलाचे केले सर्वप्रथम लसीकरण

एमपीसी न्यूज – तळेगाव येथील सरस्वती विद्यामंदिर येथे  गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत निवासी नायब तहसिलदार तथा प्रभारी तहसिलदार सुनंदा भोसले यांनी पालकांच्या मनातील भिती कमी करणेसाठी स्वत:च्या मुलाचे सर्वप्रथम लसीकरण करुन घेतले.

गोवर आणि रुबेला हा विषाणूजन्य आजार अतिशय घातक आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

 प्रभारी तहसिलदार सुनंदा भोसले  गोवर व रुबेला या लसीकरणाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, गोवर हा अत्यंत घातक विषाणूजन्य आजार आहे. लहान  मुलांच्या मृत्यूसाठी गोवर हा आजार एक प्रमुख कारण आहे. 2016 सालच्या जागतिक आकडेवारीनुसार गोवर आजारामुळे मृत्यूपैकी अंदाजे 37 टक्के मृत्यू हे भारतामध्ये झाले आहेत. तसेच रुबेला हा आजार सुद्धा संसर्गजन्य असून मुख्यत: मुले आणि तरुण पिढीमध्ये होतो. गर्भवती स्त्रियांमध्ये रुबेला या आजाराच्या संसर्गामुळे गर्भाचा मृत्यू किंवा जन्मजात दोष घेऊ शकतो. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी भारतात फेब्रुवारी 2017 पासून गोवर-रुबेला लसीकरणाची सुरुवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.