Pimpri News : पिंपरी चिंचवड शहरात रविवारी कोरोना लसीकरण राहणार बंद

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु असून रविवारी (दि. 15) हे लसीकरण बंद राहणार आहे. याबाबत महापालिकेचे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी माहिती दिली आहे.

कोविड 19 या आजारावर केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सूचनांप्रमाणे 12 वर्षांपुढील सर्व वयोगटातील नागरिकांचे कोविड लसीकरण केले जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर ही लसीकरण मोहीम सुरु आहे.

रविवारी (दि. 15) लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत. त्यामुळे रविवारी महापालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण होणार नसल्याचेही डॉ. गोफणे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात आजवर 3 लाख 59 हजार 595 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर 4 हजार 624 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या शहरात 67 कोरोनाबाधित रुग्ण असून त्या सर्व रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवले आहे.

शहरात कोविशिल्ड, कोव्हॅक्सीन, कोर्बेव्हॅक्स आणि स्पुटनिक व्ही या लसींद्वारे लसीकरण केले जात आहे. महापालिकेच्या 19 आणि खाजगी 147 लसीकरण केंद्रांवर हे लसीकरण सुरु आहे. आजवर शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर एकूण 35 लाख 85 हजार 75 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.