Talegaon : भिऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे – आमदार बाळा भेगडे

एमपीसी  न्यूज – मावळ तालुक्यातील तळेगाव स्टेशन परिसरात गेले दोन दिवस अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. दहा दिवसापूर्वी यशवंतनगर भागात कारवाई करण्यात आलेली होती. याबाबतीत आमदार बाळा भेगडे यांनी गांभीर्याने दखल घेऊन भिऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे, असा धीर नागरिकांना दिला.

तळेगाव स्टेशन परिसरातील सर्व अनधिकृत स्टॉल काढून टाकण्यात आले आहे. सद्यस्थितीत पैसाफंड काच कारखाना जवळ कारवाई चालू आहे, तसेच स्टेशन भागातील भाजी मंडई उध्वस्त करण्यात आली होती या विषयाची आमदार बाळा भेगडे यांनी गाभिर्याने दखल घेवून तात्काळ मंत्री, जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी संपर्क साधला.  ज्या भाजी विक्रेत्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना तात्काळ पर्यायी जागा तात्काळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. सन 1998 साली कै.विश्वनाथराव भेगडे (मा.नगराध्यक्ष, तळेगाव दाभाडे नगरपरिषद) हे कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती असताना त्यांनी 6 एकर जागा गवत बाजार तळेगाव स्टेशन येथे भाजी मंडई, सुलभ शौचालय या करिता आरक्षित केली होती त्या जागेवर मंडई मधील सर्व व्यावसायिकांना 15×15 चे गाळे काढून देण्यात येणार असून भाजी मंडई, फळे व इतर विक्रेते यांची विभागवार सोय करण्यात येणार असल्याचे आमदार बाळा भेगडे यांनी सूचित केले, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या वतीने ह्या कामाकरिता लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील हे सर्वोत्तम भाजी मार्केट होणार असून ह्या मार्केटला छत्रपती शिवाजी महाराज मार्केट या नावाने संबोधले जाणार आहे.

मार्केटला जोडणारे रस्ते हे रुंद व चांगल्या प्रकारचे केले जाणार असून सर्व व्यावसायिकांचा माल त्यांच्या दुकानापर्यंत पोहचण्यास अडथला येणार नाही. ह्या कामाचा लवकरच शुभारंभ होणार असल्याचे आमदार बाळा भेगडे यांनी भाजी विक्रेत्यांना सांगितले, ह्या प्रसंगी मा.नगराध्यक्ष रंजना भोसले, जेष्ठ माजी नगरसेवक गणेश भेगडे, नगरसेवक सुशील सैंदाणे, नगरसेवक गणेश खांडगे, उद्योजक किशोर आवारे तसेच सर्व आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी वैभव आवारे, व त्याचप्रमाणे मंडई मधील भाजी विक्रेते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.