Pimpri : महापालिकेची अतिक्रमणावरील धडक कारवाई सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणावरील  धडक ( Pimpri) कारवाई सुरुच आहे. क, ड क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.

क क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील कुदळवाडी, चिखलीतील 30 मीटर डीपी रस्त्यामधील 1,62,000 चौरस फुट क्षेत्रातील 15 वीट बांधकाम व पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. ड क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील नाशिक फाटा उड्डाणपूल ते कोकणे चौक या मार्गालगतच्या दुसऱ्या बाजूचे अनधिकृत पत्राशेड व बांधकामावर कारवाई करण्यात आली. सुमारे 45 हजार चौ फूट क्षेत्राचे पत्राशेड पाडण्यात आले. साई चौक जगताप डेअरी ते डांगे चौक या रस्त्यालगत कारवाई करण्यात येणार आहे.

Leep Year 2024 : दर चार वर्षांनी येते लीप वर्ष; जाणून घ्या लीप वर्षाची रोचक तथ्ये

सदरची कारवाई आयुक्त शेखर सिंह यांचे आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील व शहर अभियंता मकरंद निकम यांचे नियोजनानुसार करणेत आली. ही कारवाई अ, ब, ग, ड क्षेत्रिय कार्यालयाकडील चार टीम मार्फत करण्यात आली.

उपआयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रिय अधिकारी अण्णा बोदडे, अंकुश जाधव, अमित पंडित, अजिंक्य येळे,सुचिता पानसरे, 4 उपअभियंता, 5 कनिष्ठ अभियंता, 4 बीट निरीक्षक अतिक्रमण विभागाकडील एक पोलिस अधिकारी, 5 पोलिस, 3 महिला पोलिस 80 एमएसएफ जवान वाकड पोलीस स्टेशन कडील एक पोलिस अधिकारी व पोलीस, महिला पोलीस 4 जे सी बी, 1 कटर व 20 मजूर उपस्थित ( Pimpri) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.