Leep Year 2024 : दर चार वर्षांनी येते लीप वर्ष; जाणून घ्या लीप वर्षाची रोचक तथ्ये

एमपीसी न्यूज – दर चार वर्षांनी लीप वर्ष (Leep Year) येते. लीप वर्ष म्हणजे या ( Leep Year 2024 ) वर्षांत फेब्रुवारी महिन्यात एक दिवस अधिकचा येतो. पण हा एक दिवस अधिक का येतो, तो दर चार वर्षांनीच का येतो, अशी उत्सुकता तुम्हाला लागली असेल. तर आज आपण लीप वर्ष आणि त्याबद्दलची रोचक तथ्ये जाणून घेऊयात….

दरवर्षी फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असतो. पण दर चार वर्षांनी हा फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा होतो. ज्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस येतात, त्यालाच लीप वर्ष म्हणतात. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस आले असल्याने यावर्षी आपण लीप वर्ष (leep Year 2024) साजरे करीत आहोत.

कॅलेंडरचा जन्म

पृथ्वी स्वतःभोवती फिरते. स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वी सूर्याभोवती देखील फिरते. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे आणि ऊन, पाऊस आणि थंडी याच्या आधारावर रोमन साम्राज्याचा शासक ज्युलियस सीजर याने 12 महिन्यांचे 365 दिवसांचे कॅलेंडर बनवले.

दरवर्षी सहा तास शिल्लक राहतात

पण पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी मारण्यासाठी 365 दिवस 6 तास एवढा कालावधी लागतो. त्यामुळे दरवर्षी उरलेल्या सहा तासांचे काय करायचे, असा प्रश्न समोर आला. चार वर्षांचे सहा-सहा तास एकत्र केल्यास संपूर्ण एक दिवस होतो. त्यामुळे दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात एक दिवस अधिकचा देण्याचे ठरले.

Maharashtra : मुख्यमंत्र्यांच्या बनावट सहीचा मुद्दा विधानसभेत गाजला

जर चार वर्षांनी एक दिवस अधिकचा दिला नाही तर आपण 100 वर्षांत तब्बल 25 दिवस सूर्यमंडळाच्या पुढे जाऊ. यामुळे वातावरणातील बदल, खगोलशास्त्रावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लीप वर्षातील अधिकचा एक दिवस महत्वाचा ठरतो.

प्रभू येशू यांच्या जन्माच्या आधारावर कॅलेंडर बनवण्यात आले. त्यांच्या जन्मानंतर चार वर्षांनी पहिले लीप वर्ष साजरे करण्यात आले. ग्रीस मध्ये लीप वर्षांत विवाह करत नाहीत. लीप वर्षांत विवाह करणे तिथे अपशकून मानले जाते.

तीन पिढ्यांचा जन्म लीप वर्षात

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अशा एका परिवाराचा समावेश आहे, ज्या परिवारातील तीन पिढ्यांचा जन्म 29 फेब्रुवारी रोजी झाला आहे. 29 फेब्रुवारी 1940 रोजी पीटर एंथोनी यांचा जन्म झाला. त्यांच्या मुलाचा जन्म 29 फेब्रुवारी 1964 रोजी जन्म झाला. तर त्यांच्या नातवाचा 29 फेब्रुवारी 1996 रोजी जन्म झाला आहे.

भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा जन्म लीप वर्षांत झाला होता. 29 फेब्रुवारी 1896 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी 1977 मध्ये भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. जगप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना रुक्मिणी देवी यांचा देखील जन्म 29 फेब्रुवारी रोजी झाला ( Leep Year 2024 ) होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.