Talegaon Dabhade: आकांक्षा गायकवाड व प्रकाश देशमुख ठरले इंद्रायणी मॅरेथॉनचे विजेते

तीन हजार खेळाडूंनी घेतला सहभाग

एमपीसी न्यूज – इंद्रायणी विद्या मंदिर, मावळ तालुका खाण व क्रशर उद्योग संघ, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी, लायन्स क्लब ऑफ तळेगाव, संजय साने, निरुपा कानिटकर व रणजीत काकडे यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार कृष्णराव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या इंद्रायणी मॅरेथॉन स्पर्धेत खुल्या गटात आकांक्षा गायकवाड व प्रकाश देशमुख यांनी विजेतेपद पटकाविले. सुमारे तीन हजार खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

मारुती मंदिर चौकात आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर हिच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी राष्ट्रीय खेळाडू हर्षदा जोशी-दुबे, एव्हरेस्टवीर राजेश पटाडे, राष्ट्रीय वेटलिफ्टर नितीन म्हाळसकर हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आमदार बाळा भेगडे होते. त्यावेळी माजी आमदार कृष्णराव भेगडे तसेच केशवराव वाडेकर, सुरेशभाई शहा, मुकुंद खळदे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, सीआरपीएफचे डीआयजी बिरेंद्रकुमार टोपो, रोटरी क्लबचे प्रांतपाल डॉ. शैलेश पाळेकर तसेच प्रशांत जगताप, मकरंद टिल्लू, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष नितीन शहा, लायन्स क्लब ऑफ तळेगावच्या अध्यक्षा राजश्री शहा, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, स्पर्धेचे मुख्य संयोजक विलास काळोखे, संदीप काकडे तसेच नगरसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे –
वयोगट
इयत्ता 7 वी ते 10 वी मुले (तीन किलोमीटर)
1 सिद्धेश मारूती चौधरी
2 गणेश बाबुराव कोळपे
3 साईराज भाऊसाहेब कोळपे

इ 7 वी ते 10 वी मुली (दोन किलोमीटर)
1 शितल हरिदास डुकरे
2 निकीता बंडू हजारे
3 ट्विंकल विकास पिंगळे

खुला पुरूष गट (तीन किलोमीटर)
1 प्रकाश बाळासाहेब देशमुख
2 आकाश धोंडीबा हिरवे
3 लक्ष्मण हशा दरोडा

खुला महिला गट (दोन किलोमीटर)
1 आकांक्षा गायकवाड
2 सिया दत्तात्रय मोळक
3 सुवर्णा बबन साबळे

वरिष्ठ गट/ ज्येष्ठ नागरिक (दोन किलोमीटर)
अशोक आमले
हरिश्चंद्र थोरात
माणिक विष्णू एकाड
आशा पाटील

सुरेश गराडे – ज्येष्ठ असून खुल्या गटात धावले…. उत्तेजनार्थ

स्पर्धेची संकल्पना इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे यांची होती तर स्पर्धेचे संयोजन विलास काळोखे, संदीप काकडे, चंद्रभान खळदे, संजय वाडेकर, संजय साने, सुनील काशिद, प्रा. सुरेश थरकुडे, प्रा. प्रतिभा डबीर आदींनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.