Talegaon News : 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहात साजरा

पर्यावरण संरक्षण आणि एकतेचा कोरोना जागृतीचा संदेश

एमपीसी न्यूज – श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यता दिवस कोरोना नियमाचे पालन करत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसह्याद्री महानाट्यचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विनय दाभाडे उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमात श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, उपाध्यक्ष दादासाहेब उऱ्हे ,कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे, खनिजदार सुदाम दाभाडे, संचालक ॲड. श्रीराम कुबेर, विलास काळोखे, सूर्यकांत ओसवाल, शालेय समिती उपाध्यक्षा जयश्री जोशी, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे रोटरीयन्स प्रवीण भोसले, सुनील खोल्लम, योगेश शिंदे, सचिन कोळवणकर, युवराज पोटे, प्रवीण जाधव, शंकर हदिमनी, जयश्री घोजगे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व उपस्थितांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आली. नयन बाळसराफ व शालेय शिक्षिका आयेशा सय्यद यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड. विनय दाभाडे यांनी आपल्या मनोगतातून पर्यावरण संरक्षणाबरोबरच कोरोना काळात काळजी घेण्याचा संदेश दिला. आपले अनुभव व्यक्त करून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या भाषणातून त्यांनी पर्यावरण समतोल राखण्यात बरोबर एकतेचा संदेश दिला कोरोना नियमाचे पालन करण्याचे आव्हान केले. कोरोना महामारी वर मात करून पुन्हा देशात आनंदी आनंद नांदेल, असा विश्वास व्यक्त केला व देश महासत्ता बनेल असा आशावाद व्यक्त केला.

स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  ओम कवळे याने पोवाडा सादर केला. रुद्रप्रताप बोराडे याने मंगल पांडे , पुर्वा जाधव हीने राणी लक्ष्मीबाई, अथर्व सलागारे याने चंद्रशेखर, आदिती गुडमे हिने लोकमान्य टिळक आदी स्वातंत्र्य सेनानी, देशभक्तांच्या वेशभूषा केली होती तसेच ऑनलाईन देशभक्तीपर गीत स्पर्धा आयोजित करण्यात आली.

या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका शमशाद शेख मॅडम, पर्यवेक्षिका रेणू शर्मा मॅडम, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री पाटील व दीक्षा गायकवाड यांनी केले. श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे व प्रमुख पाहुणे ॲड. विनय दाभाडे यांच्या हस्ते मिठाईचे वाटप करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.