Talegaon News : प्रतिभा शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “मेधावीन फाउंडेशन”ची स्थापना 

एमपीसी न्यूज – तळेगाव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली प्रमोद दाभाडे यांच्या संकल्पनेतून प्रतिभा शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत “मेधावीन फाउंडेशन ” ची स्थापना करण्यात आली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सारिका सुनील शेळके व एपीआय कुंदा गावडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. स्वागत गीत ज्योती दाभाडे यांनी गायले, आलेल्या पाहुण्यांचे स्वागत निशा पवार, संस्थेचे उद्दिष्ट वर्षा येवले यांनी मांडले प्रास्ताविक पर मार्गदर्शन संस्थापक वैशाली दाभाडे यांनी केले. संस्थेमार्फत महिला सबलीकरण, सक्षमीकरण, सशक्तीकरणावर भर देऊन महिला उद्योजिका तयार करण्याचा मानस आहे. संस्थेच्या मार्फत महिलांना आर्थिक मदत होईल या दृष्टीने कोर्स देण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाच्या वेळी प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक स्वरूपात 15 ज्येष्ठ महिलांचा सत्कार अनुपमा दाभाडे व शांता तावरे यांच्या हस्ते स्वेटर देऊन करण्यात आला तसेच 75 महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच केक प्रशिक्षण देऊन केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी माजी उपनगराध्यक्षा माया चव्हाण, नगरसेविका मंगल भेगडे, हेमलता खळदे, संगीता शेळके, पूजा वहिले उपस्थित होत्या. उद्योजिका स्वाती पवार, मीरा गणेश म्हस्के, सोनिया विशाल खळदे, सारिका नवले, संध्या थोरात, शैलजा काळोखे, अमृता नवले यांनी संस्थेला शुभेच्या दिल्या.

केकचे प्रशिक्षण मधुरा ढमढेरे, राजेश्री उमक, शिवानी सोनावणे यांनी दिले. सर्व पाहुण्यांचे स्वागत सॅनिटायझर व 95 मास्क देऊन व आलेल्या सर्व महिलांना एन 95 मास्क देण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन ज्योति शिंदे, रुपाली झवेरी व वीणा दाभाडे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा जाधव यांनी केले, आभार स्वाती विक्रम दाभाडे यांनी मानले. या वेळेस अनेक महिला पद्धाधिकारी व गृहिणी उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.