Talavade News : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडे रुपीनगर परिसरात विविध सामाजिक उपक्रम

नगरसेवक प्रविण भालेकर यांचा पुढाकार

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महापालिकेचे रुपीनगर तळवडे येथील नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी मोफत चष्मे वाटप, रक्तदान शिबिराचे आयोजन केले.

शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नेत्र चिकित्सा शिबिरामध्ये डोळे तपासणी केलेल्या नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. रुपीनगर येथील सोनिगरा मैदानात रक्तदान शिबिर घेण्यात आले.

रक्तदान शिबिरास खासदार डॉ. अमोल कोल्हे , आमदार चेतन तुपे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक अजित गव्हाणे, पंकज भालेकर, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे आदींनी भेट दिली.

_MPC_DIR_MPU_II

राज्यात दररोज साधारणतः पाच हजार रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते. विविध शस्त्रक्रिया आणि पीडित रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासते. कोरोना प्रादुर्भावामुळे नियमित चालणाऱ्या रक्तदान शिबिरांना फटका बसला आहे. परिणामी राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक प्रविण भालेकर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. शिबिरासाठी नागरिकांचा व विशेषतः तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

रक्तदान शिबिरात 160 पिशव्या रक्तसंकलन झाले. या शिबिरामध्ये पिंपरी चिंचवड ब्लड बँकेचे मकरंद शहापूरकर व डॉक्टरांच्या पथकाने आवश्यक तपासण्या तसेच स्वछता व फिजिकल डिस्टन्सचे पालन करून रक्तसंकलन केले. नेत्र चिकित्सा शिबिरामध्ये डोळे तपासणी केलेल्या 150 महिलांना नगरसेवक प्रवीण भालेकर यांच्या माध्यमातून मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले, “शरद पवार यांचा या वर्षीचा वाढदिवस म्हणजे आठ दशके कृतज्ञतेची आहेत. त्यामुळे विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. प्रवीण भालेकर यांनी रक्तदान शिबिर व मोफत चष्मे वाटप उपक्रम राबवुन सामाजिक बांधिलकी जपली आहे. असे सांगून खासदर कोल्हे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरसेवक प्रवीण भालेकर युवा मंच व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनमोल सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.