Pune : शिरूर – बारामती लोकसभेला अजित पवारांकडे उमेदवार कोण?

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुटुंबात (Pune)मला एकटे पडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बारामतीत म्हटले होते.

त्यांच्या या आवाहानानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Thergaon :सदनिकांवर ताबा मारून भाडेकरार करत फसवणूक

लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. (Pune)या निवडणुकीत बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात पवार यांच्याकडे उमेदवार कोण असणार याची उत्सुकता लागली आहे. शरद पवार यांच्या गटाकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत देण्यात आले आहे.
या निवडणुकीत तुम्हाला भावनिक आवाहन केले जाईल.

तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, तुम्ही विचलित होऊ नका, असे आवाहन अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले. मला तुमची साथ आहे. तुमचा पाठिंबा आहे. तुम्ही जोपर्यंत एकजूट आहात तोपर्यंत माझं काम अशाच तडफेने चालत राहील. मी तुम्हाला पुन्हा सांगतो. काहीजण तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. पण भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही.

भावनिक झाल्याने कामं होत नाहीत. काम हे तडफेनेच करावे लागते. पूर्ण जोर लावूनच काम करावे लागते, असेही अजित पवार यांनी निक्षून सांगितले. त्यावर शरद पवार यांनीही टीका केली.

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. तर, इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याही नावाची बारामती लोकसभा मतदारसंघात सुरू आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.