Thergaon :सदनिकांवर ताबा मारून भाडेकरार करत फसवणूक

एमपीसी न्यूज – सदनिकांवर बेकायदेशीरपणे ताबा (Thergaon)मारून त्यामध्ये भाडेकरू ठेवून त्यांच्याकडून भाडे घेतले. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फेब्रुवारी 2022 ते 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत थेरगाव येथे घडली.

दीपक जीवनदास पंजाबी (वय 54) यांनी याप्रकरणी (Thergaon)वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शरद कुंडलिक बारणे, बाळासाहेब कुंडलिक बारणे (दोघे रा. थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या राजनंदनी डेव्हलपर्स या संस्थेच्या मालिकेच्या चार सदनिकांवर बारणे यांनी ताबा घेतला. फिर्यादी यांना सदनिकांवर येण्यास मज्जाव करत धमकी दिली.

 

Wakad : पाच मिनीटात लाईट फिटीग करून दे म्हणत काका-पुतण्याला टिकावाने मारहाण

त्या सदनिकांमध्ये बारणे यांनी भाडेकरू ठेवले. त्यांच्याबरोबर अप्रामाणिकपणे भाडेकरार केले. एका सदनिकेचे 40 हजार रुपये डिपॉझिट आणि दरमहा 16 हजार रुपये भाडे घेऊन स्वतः आर्थिक कमाई घेऊन फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.