Wakad : सुर्यनमस्कार महोत्सवाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका व आशाकिरण( Wakad )सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै. तानाजी कलाटे उद्यान, वाकड येथे जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त सूर्यनमस्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात सुमारे 400 नागरिकांनी सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पेंडसे, सामाजिक कार्यकर्त्या वृषाली कलाटे (Wakad )उपस्थित होत्या. यावेळी योगशिक्षिका शुभांगी पवार यांनी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिके करून दाखविली.

आशाकिरण सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रामकृष्ण पालमकर म्हणाले, 2015 पासून दरवर्षी हा सूर्यनमस्कार महोत्सव पिंपरी चिंचवड महापालिका व आशाकिरण सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात आहे. 27 हजार विद्यार्थ्यांनी यामध्ये सूर्यनमस्कार केलेले आहेत. 2015 साली सुरू झालेल्या महोत्सवाचे हे दहावे वर्ष आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने आशाकिरण सोशल फाऊंडेशनने सलग दहा वर्ष हा उपक्रम निरंतर सुरू ठेवण्याचे काम केले आहे. अगदी लॉकडाऊनच्या काळात देखील ऑनलाईन पद्धतीने सूर्यनमस्कार महोत्सव घेण्यात आला होता.

 

Wakad : पाच मिनीटात लाईट फिटीग करून दे म्हणत काका-पुतण्याला टिकावाने मारहाण

नरेंद्र पेंडसे यांनी सूर्यनमस्काराचे फायदे सांगितले तसेच सूर्यनमस्कार हा एक सर्वांग सुंदर व्यायाम आहे असेही ते म्हणाले. यावेळी मुख्य योग शिक्षक म्हाळसाकांत देशपांडे यांनी इतरही योग प्रकारांचे प्रशिक्षण उपस्थितांना दिले. त्याचप्रमाणे क्रीडा पर्यवेक्षक दिपक कन्हेरे यांनी यावेळी उपस्थितांना योगसाधनेबद्दल मार्गदर्शन केले.

क्रीडा अधिकारी अनिता केदारी म्हणाल्या, 2015 साली सुरू झालेल्या उपक्रमाची सुरुवात मोरया गोसावी क्रीडांगण चिंचवडगाव येथे झाली होती. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या विविध उपक्रमांना नागरिकांसोबत सामाजिक कार्यकर्त्यांचे तसेच लोकप्रतिनिधींचे नियमित सहकार्य लाभत असते. नागरिकांनी सदृढ आरोग्याच्या दृष्टीने रोज सकाळी सूर्यनमस्कार करायला हवा, असेही क्रिडा अधिकारी केदारी यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त शहरातील सर्व शाळांनी सूर्यनमस्कार करावे असे आवाहन महापालिकेच्या क्रीडा विभागामार्फत करण्यात आले होते, ज्याला सर्व खासगी तसेच महापालिका शाळांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशाकिरण सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रामकृष्ण पालमकर यांनी सूत्रसंचालन स्मिता दीपक चौगुले यांनी तर शुभांगी पवार यांनी आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.