Mp Shrirang Barne : खासदार श्रीरंग बारणे यांचे दातृत्व, वाढदिवसाच्या दिवशी तरुणाला किडनी ट्रान्सफरसाठी एक लाखाची मदत  

एमपीसी न्यूज – मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे (Mp Shrirang Barne)दातृत्व पुन्हा एकदा समोर आले आहे. बारणे यांनी वाढदिवसादिवशी काळेवाडीतील एका गरजु कुटुंबातील तरुणाला किडनी ट्रान्सफर (किडनी प्रत्यारोपण)साठी एक लाखाची वैयक्तिक मदत केली.

काळेवाडीत राहणा-या अनिल पालांडे या तरुणाला एक लाख (Mp Shrirang Barne)रुपयांच्या मदतीचा धनादेश खासदार बारणे,  युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विश्वजीत बारणे यांच्या हस्ते देण्यात आला. खासदार बारणे यांचा वाढदिवस शुक्रवारी विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा झाला.

Sangvi : कलाश्री संगीत महोत्सवात पहिल्या दिवशी शास्त्रीय गायन, सारंगीने घेतला रसिकांच्या काळजाचा ठाव

दरवर्षी वाढदिवसानिमित्त बारणे यांच्यामार्फत आरोग्य शिबिर घेतले जाते. गरजु रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. काळेवाडी येथे राहणारा अनिल याला  किडनी ट्रान्सफर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येणार आहे. ही बाब युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विश्वजीत बारणे यांना समजली. त्यांनी तत्काळ एक लाख रुपये देण्याचे मान्य केले. खासदार बारणे यांच्या वाढदिवसादिवशी एक लाख रुपयांचा धनादेश अनिल याच्याकडे सुपुर्द केला.

अनिल पालांडे या तरुणाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. किडनी ट्रान्सफरसाठी मोठा खर्च आहे. त्याला वैयक्तीक एक लाख रुपयांची मदत केली. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही मदत मिळवून देणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.