Talegaon News : मुलाला वाचविताना होमिओपॅथी एमडी डाॅक्टरचा पाण्यात बुडून मृत्यू

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ समोरील तळ्यात बुडत असलेल्या आपल्या सात वर्षीय मुलाला वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेल्या वडिलांचा गाळात अडकून मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी (दि.6) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

योगेश शंकर नारखेडे (वय ३७, रा. तळेगाव दाभाडे) असे पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. योगेश हे व्यावसायाने होमिओपॅथी एमडी डाॅक्टर होते. तर नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक शंकर नारखेडे यांचे ते पुत्र होत.

रविवारी सायंकाळी डॉ. नारखेडे हे आपला मुलगा अविनाश आणि दिवेश (वय 3) यांच्यासह तळ्याकाठी फेरफटका मारण्यासाठी गेले होते. तळ्याकाठी बसले असता मातीच्या भरावावरून घसरून अविनाश तळ्यातील पाण्यात पडला.

त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी डाॅ. नारखेडे तळ्यातील पाण्यात उतरले. यात अविनाश याला वाचविण्यात त्यांना यश आले. मात्र, पोहता येत असतानाही तळ्यात जास्त गाळ असल्याने त्यांचा गाळात अडकून मृत्यू् झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.