Talegaon News : इंद्रायणी डी फार्मसी महाविद्यालयात ‘राष्ट्रीय वाचन दिन’ उत्साहात

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्था संचलित इंद्रायणी इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी (डी. फार्मसी ) महाविद्यालयामध्ये आज शनिवारी (दि 19) “राष्ट्रीय वाचन दिन” उत्साहात संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य जी. एस. शिंदे यांनी दिली.

पी. एन. पणीक्कर यांच्या पुण्यतिथी निमित्त दि. 19 जून हा दिवस ‘राष्ट्रीय वाचन दिन’ म्हणून साजरा केला जातो.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य जी. एस. शिंदे, ग्रंथपाल पंकज दुगाने यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य जी. एस. शिंदे यांनी केले. त्यामध्ये त्यांनी वाचनाचे महत्त्व, राष्ट्रीय वाचन दिनाचे महत्त्व व पी. एन. पॅनीकर यांचे कार्य थोडक्यात सांगितले.

या निमित्ताने ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी दुपारी 2 ते 3 या वेळेत ग्रंथालयात बसून विविध संदर्भ ग्रंथाचे वाचन करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, उपाध्यक्ष गोरखनाथ काळोखे, साहेब, डाॅ. दीपक शहा कार्यवाह चंद्रकांत शेटे,कोषाध्यक्ष शैलेश शहा, संस्थेच्या विश्वस्त निरुपा कानिटकर व संदीप काकडे आदी मान्यवरांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.