Talegaon News: गृहरचना संस्थेवर कारवाईच्या मागणीसाठी बेमुदत आंदोलनाचा इशारा 

एमपीसी न्यूज : विकासकाने केलेल्या फसवणुकीबाबत लेखी तक्रार करूनही त्या जागेवर बेकायदेशीरपणे नोंदणी झालेल्या सहकारी गृहरचना संस्थेवर कोणतीही कारवाई न झाल्याने पीडित कुटुंब बेमुदत आंदोलन करणार आहे.(Talegaon News) वडगाव मावळ येथील सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) यांच्या कार्यालयासमोर 5 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक हे देखील सहभागी होणार आहेत.

 

फसवणूक प्रकरणी स्नेहा नीलेश माहुलकर यांनी वडगाव मावळ येथील सहकारी संस्था सहाय्य्क निबंधक कार्यालयात 8 जुलै रोजी तक्रार दिली होती. (Talegaon News) या तक्रारीनुसार, विकासक नारायण सोलंकी व जगदीश सोलंकी यांनी फिर्यादींची यशवंतनगर येथील सर्वे क्रमांक 514 व 515 अशी 37 ते 45 प्लॉटची सर्वेक्रमांक 409 ही वडिलोपार्जित जमीन खरेदी केली. यावेळी खरेदी खत करताना सोलंकी यांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना अंधारात ठेवत त्यावर कुठल्याही वारसाची नोंद व हरकत न घेता दबाव वापरून 1994 साली खरेदी खत केले. ही मूळ जमीन काशिनाथ माहुलकर यांची होती.

 

Shravani Somvar: पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त आळंदीत शिवलिंग दर्शनासाठी भाविकांनी गर्दी

 

पुढे सोलंकी याने जागेवर सोलंकी कॉम्प्लेक्स उभारले. यावेळी त्याने माहुलकर यांना खरेदीखतामध्ये ठरल्याप्रमाणे 700 चौ.फूटचा तळमजला देणे अपेक्षित होते. याखेरीज त्यांची 14 बाय 10 फुटांची पिठाची गिरणी आहे ती तशीच ठेवण्यात यावी व त्यांना मागील त्यांच्या रहात्या घरात जाण्या-येण्याचा हक्क राहील, असे खरेदीखतात स्पष्ट म्हटले आहे. मात्र, सोलंकी याने उडवा-उडवीची उत्तरे देत माहुलकर यांना ती जागा दिलीच नाही. यावरून माहुलकर यांनी सहाय्य्क निबंधक कार्यालायात समक्ष भेटून लेखी तक्रार केली होती.

 

महिना उलटून गेला तरी त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अद्याप साधी नोटीसही विकासक व गृहरचना संस्थेस बजावण्यात आलेली नाही. (Talegaon News) याप्रकरणी लवकरात लवकर कोणतीही कारवाई झाली नाही, तर संपूर्ण माहुलकर कुटुंब व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक हे 5 ऑगस्टपासून सहायक निबंधक कार्यालयाबाहेर बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा स्नेहा महुलकर यांनी लेखी पत्राद्वारे दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.