Infosys E Buses: पीएमपीएमएलचा इन्फोसिस कंपनीबरोबर करार, ‘इन्फोसिस’ कर्मचाऱ्यांची ने-आण करणार

एमपीसी न्यूज: पीएमपीएमएल कडून विविध कंपन्यांचे कर्मचारी ने-आण करण्यासाठी इन्फोसिस कंपनीने पीएमपीएमएल बरोबर करार केला आहे. (Infosys E Buses) त्यानुसार इन्फोसिस कंपनीला त्यांचे कर्मचारी ने-आण करण्यासाठी मासिक करारावर विविध 11 मार्गांवर एकूण 11 स्मार्ट एसी ई-बस आज दि. 1ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहेत.

 

हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनी येथे या सेवेचे उद्घाटन करून या ई-बसेस मार्गस्थ करण्यात आल्या.(Infosys E Bus) पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालिका मा. डॉ. चेतना केरूरे, इन्फोसिसचे व्हाईस प्रेसिडेंट व डिलीव्हरी हेड मा.श्री. प्रविण कुलकर्णी यांच्या हस्ते ई बसेसना हिरवा झेंडा दाखवून बसेस मार्गस्थ करण्यात आल्या.

 

Har Ghar Tiranga : महापालिका नागरिकांना विकणार राष्ट्रध्वज; उद्यापासून क्षेत्रीय कार्यालयात मिळणार ध्वज!

 

याप्रसंगी इन्फोसिसच्या असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट व सिनिअर रिजनल हेड फॅसिलीटीज मा. श्रीमती विजयालक्ष्मी मणी, रिजनल मॅनेजर फॅसिलीटीज मा. श्री. जय सुर्यवंशी, सिनिअर मॅनेजर फॅसिलीटीज मा. श्री. नितीन मांजरे, पीएमपीएमएलचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) मा. श्री. दत्तात्रय झेंडे, चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (कमर्शियल) मा. श्री. सतिश गव्हाणे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी मा. श्री. चंद्रकांत वरपे, कामगार व जनता संपर्क अधिकारी मा. श्री. सतिश गाटे, असि. डेपो मॅनेजर श्री. राजेश जाधव, नियोजन विभागातील अधिकारी श्री. नवनाथ बडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

हडपसर, मुंढवा चौक, वारजे पूल, आकुर्डी, कळस, निगडी, पिंपरी रोड, सांगवी, दांडेकर पूल, चिंचवड गाव या ठिकाणाहून (Infosys E Buses) इन्फोसिस कंपनीपर्यंत इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी 11 स्मार्ट एसी ई बस निर्धारीत वेळेनुसार उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.