Abhay Gondane Murder : अभय गोंडाणे मृत्यूप्रकरणी संस्था करणार पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन

एमपीसी न्यूज : हॉटेलमध्ये झालेल्या वादातून अभय गोंडाणे (Abhay Gondane Murder) उर्फ श्रेयस या तरुणाने मारहाणीच्या भीतीने उडी घेतली. त्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळण्यासाठी तृतीया फाउंडेशन, उडान ट्रस्ट, रिपब्लिकन युवा मोर्चा आणि एफ.पी.ए.आय या संस्था 4 ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करणार आहेत. अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डंबाळे म्हणाले, की रात्री दीडच्या दरम्यान ‘द बार हिस्ट हॉटेल’ बेकायदेशीरपणे चालू होते. या हॉटेलच्या मालक, मालकीण, मॅनेजर व बाउन्सर्स यांच्या मारहाणीत त्याचा निष्पाप मृत्यू झाला. पोलिसांनी अजून सर्व आरोपींना अटक केली नाही. त्यामुळे सर्व आरोपींना लवकर अटक करण्यात यावी. नामांकित खाजगी रुग्णालयाने उपचार न करता ससून रुग्णालयाला पाठवले. त्यामुळे त्या तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. त्यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्या रुग्णाल्यावर कारवाई करावी.

पोलीस तपासाबाबत नाराजी व्यक्त करत डंबाळे म्हणाले की, “या मृत्यु प्रकरणी भा.द.वी कलम 302, 307 व इतर कठोर कलमे लावणे अपेक्षित होते. पण, ती लावण्यात आली नाही. कठोर कलम आरोपींच्या विरोधात लावावी. हॉटेलच्या मालकीणला अजून अटक झालेली नाही. त्यामुळे तिला अटकपूर्व जामीन देण्यासाठी वेळ दिला जात असल्याची शंका आहे.

Abhay Gondane Murder

Pune cartridges seized: पुण्यात पोलिसांच्या कारवाईमध्ये 8 पिस्टल व 24 जिवंत काडतुसे जप्त

अभयला एलजीबीटी कमिटीबाबत आत्मीयता होती. तो त्याची ट्रान्सजेंडर मैत्रीण मन्नत शेख सोबत हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला होता. त्या रात्रीच्या घटनाक्रमाबद्दल त्या म्हणाल्या, कि “त्या रात्री मी हॉटेल मालकांबरोबर बोलत होते. मी श्रेयसला बोलले, की सकाळी ऑफिसला जायचे असल्यामुळे आपण निघुया. आम्ही निघालो तर हॉटेलच्या मालकीनीने मला धक्का दिला. त्यामुळे आमच्यामध्ये वाद झाला. पुरुष बाउन्सरने मला हात लावला. त्याला अभयने विरोध केला. हा वाद वाढला. आम्हाला खुर्च्यांनी मारहाण करण्यात आली. माझ्या डोक्यात ग्लासने मारल्याने मी रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडले. अभयने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. मला नंतर समोरच्या दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजवरून कळाले, की तो काही वेळ लटकत होता व नंतर खाली पडला.”

शेख पुढे (Abhay Gondane Murder) म्हणाल्या की, “मला अर्धा तासाने शुद्ध आल्यावर मी खाली गेले. तेव्हा श्रेयस जखमी अवस्थेत खाली पडला होता. आमच्या दोघांचे फोन हॉटेलमध्ये होते. मी काही गाड्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण मला रक्तबंबाळ पाहून ते थांबत नव्हते. नंतर काही तरुण आले. त्यांनी आमचा व्हिडीओ काढून पोलिसांना कळवले. त्यामुळे पोलीस येऊन ऍम्ब्युलन्समध्ये आम्हाला रुग्णालयात घेऊन गेले. हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमऱ्यांचे फुटेज अजून पोलिसांना मिळाले नाहीत. त्यामुळे आत काय झाले ते कळत नाही.

प्रेरणा वाघेला यांनी मागणी केली, की या मृत्यू प्रकारणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात यावा. तसेच त्याचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवावा. अनिल उकरांडे यांनी मागणी केली, की हॉटेल व बारमध्ये जर ट्रान्सजेन्डर बाउन्सर नाही ठेवता आले तर स्त्री बाउन्सर पण असावेत. तृतीया फाउंडेशन, उडान ट्रस्ट, रिपब्लिकन युवा मोर्चा आणि एफ.पी.ए.आय व इतर संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.