Talegaon News : साजिद शेख यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगावात सामाजिक उपक्रम

एमपीसी न्यूज – माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे विश्वासू सहकारी साजिद शेख यांचा वाढदिवस तळेगाव दाभाडे शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शेख यांचा वाढदिवस यंदा साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.

शेख यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या तळेगाव दाभाडे कोविड सेंटर मधील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचा तीन लाख रुपयांचा मोफत विमा काढण्यात येणार आहे‌.

तसेच, खडक मोहल्ला, नालबंद गल्ली व बाजारपेठ भागातील नागरिकांना व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, आयन फोलिक ॲसिड गोळयांचे वाटप करण्यात येणार आहे व प्रत्येक घरांचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने व अनेक सामाजिक उपक्रम राबवत यावर्षी वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.