Talegaon : मैत्रिणीच्या भावाकडून युवकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – मैत्रिणीच्या भावाने (Talegaon ) एका युवकाला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 8) रात्री दहा वाजता शिरगाव रोड, सोमाटणे येथे घडली.

नासिर अब्दुल शेख (वय 17, रा. सोमाटणे गाव, ता. मावळ) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुणाल मटकर आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेले होते. मैत्रिणीला भेटून त्यांच्या इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरला आल्यानंतर मैत्रिणीचा भाऊ कुणाल हा तिथे आला.

Alandi : बँकेची गोपनीय माहिती घेत 50 हजारांची फसवणूक

त्याने फिर्यादीस दमदाटी करून शिवीगाळ केली. त्यानंतर (Talegaon) दगडाने व लाकडी फळीने डोक्यात मारले. कुणाल याच्या दोन साथीदारांनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीस जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.