Talegoan Dabhade : म्हाळसाकांत विद्यालयाचे प्राचार्य अन्सार शेख यांचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अन्सार शेखयांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊननुकतेच सन्मानित करण्यात आले. प्रशस्तीपत्र, शाल ,श्रीफळ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी , राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांच्या हस्ते प्राचार्य अन्सार शेख यांचा सपत्नीक(शमरजहाँशेख)सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे ,सचिव डॉ. अशोक भोसले ,मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष हनुमंत कुबडे, अरुण थोरात, शिवाजी किलबिले आदी मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य शेख यांची पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेत ३४ वर्षे सेवा झाली असून उत्कृष्ट संघटक म्हणून ते ओळखले जातात. संस्थेचे संस्थापक बाबुरावजी घोलपसाहेब यांच्या नावाने दिला जाणारा कै.बाबुरावजी घोलप या मानाच्या पुरस्काराने शेख यांना यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे. प्राचार्य शेख यांनी बालभारतीच्या गणित अभ्यासगट सदस्य तसेच एससीईआरटी मध्ये सातत्य पूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीसाठी महाराष्ट्र राज्य तज्ज्ञ अध्यापक म्हणून काम केले आहे. महाराष्ट्र राज्य गणिताचे राज्यस्तरीय प्रशिक्षणात साधन व्यक्ती म्हणूनही काम केले आहे. पुणे जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे उपसचिव म्हणूनही त्यांनी यशस्वी काम केले आहे.संस्था पदाधिकारी,मुख्याध्यापक संघटना तसेच शिक्षक ,शिक्षकेतर संघटनेने प्राचार्य शेख यांचे अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.