Talegaon Dabhade : तालुकास्तरीय खोखो स्पर्धेत चैतन्य इंटरनॅशनल स्कूलच्या संघाला यश

एमपीसी न्यूज – नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय खोखो स्पर्धेत चैतन्य इंटरनॅशनल स्कूल इंदोरी या शाळेच्या संघाला यश मिळाले. (Talegaon Dabhade) संघाने तिसरा क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेला गवसणी घातली आहे. याबद्दल शालेय समितीच्या सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

‘चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला खो-खोच्या स्पर्धेत मावळ तालुका स्तरावरील तृतीय क्रमांक ‘ चैतन्य इंटरनॅशनल स्कूल CBSE) इंदोरी, दि 28 नोव्हेंबर व 29 नोव्हेंबर 2022 रोजी ‘पुणे जिल्हा क्रीडा परिषद क्रीडा अधिकारी कार्यालय व सिद्धांत इंटरनॅशनल  स्कूल सुदूंबरे “यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  तालुका आंतरशालेय खो-खो स्पर्धेत चैतन्य इंटरनॅशनल स्कूलच्या 17 वयोगटा खालील मुले प्रज्वल मराठे, साहिल शिंदे, बिशू रावत,हिमांशू सिंग, अखिलेश यादव,साहिल रात्रे,अथर्व वीर,समर्थ राऊत, शुभम रावत, सुप्रीम मंडल,सुजल रात्रे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

Today’s Horoscope 04 December 2022- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

मेहनत, चिकाटी, एकाग्रता हे सर्व एकवटून सर्व खेळाडू मन लावून खेळत होते. खो-खो चा सामना खूपच चुरशीचा ठरला. विद्यार्थ्यांनी खेळाचा मनमुराद आनंद घेतला. (Talegaon Dabhade) सर्व खेळाडू आपले कौशल्य पणाला लावून खेळले व हे यश खेचून आणले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

शालेय समितीच्या सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.