Talegaon News : सांधण व्हॅली येथे माउंटन एज ॲडवेंचर्सचा 118 वा ट्रेक संपन्न

एमपीसी न्यूज – (श्याम मालपोटे) आशिया खंडामधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात खोल दरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सांधण दरी येथे तळेगाव येथील माउंटन एज ॲडवेंचर्स या संस्थेने ट्रेक आयोजित केला होता. निसर्गाच्या कुशीत दडलेली ‘सांधण दरी’ हे आश्चर्य आजही आपल्यापैकी अनेकांच्या नजेरेपासून दूर आहे.

अहमदनगर जिल्ह्यातल्या साम्रद या गावातून पुढे दीड ते दोन किमी नागमोडी वळणे घेत जाणारी ही खोल दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते. चिंचोळी वाटपुढे इतकी निमुळती होत जाते की, कित्येक ठिकाणी सूर्याचाप्रकाश जमिनीपर्यंत पोहचत नाही.

समोर आजोबा डोंगर, रतन गड आणि मागे अलंग-मदन -कुलंग गड आणि कळसुबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही सांधण दरी सर करणे आपल्याला वाटते तितके सोपे नाही. सांदण दरी दोनशे ते चारशे फुटखोल आणि जवळ जवळ 4 किमी लांबवर पसरलेली आहे.

कोरोनाची सर्व निर्बंध उठवल्यानंतर सहभागी सर्व ट्रेकर्सने या ट्रेकचा मनमुरादपणे आनंद लूटला. या ट्रेकचे नियोजन संस्थेचे ट्रेक लीडर मंदार थरवल, मनोज राणे,अनिल जाधव व संजय निकाळजे यांनी केले होते.

ट्रेकदरम्यान सांधण दरीबद्दल सर्व माहिती देण्यात आली होती व एकूण 35 ट्रेकर्स सहभागी झाले होते. दरम्यान, येणाऱ्या काळामधे सह्याद्रीतील आणखीन ट्रेक आयोजित करण्यात येणार असल्याचे माउंटन एज ॲडवेंचर्स ग्रुप चे मुख्य रोहित नागलगाव यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.