Bhosari News : रस्ता क्रॉस करताना भरधाव टेम्पोच्या धडकेत ज्येष्ठ महिला ठार

एमपीसी न्यूज – रस्ता क्रॉस करणार्‍या जेष्ठ महिलेला भरधाव वेगाने जाणार्‍या टेम्पो चालकाने धडक दिली. यामध्ये महिलेचा मृत्यु झाला.हि घटना बुधवारी (दि. 6) घडली.

चित्ररेखा कोहिनकर (वय 64) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

मयुर बाळासाहेब कोहीनकर (वय 35 रा. साई ब्लेसिंग बिल्डिंग संतनगर मोशी) यांनी याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील आहार हॉटेलसमोरील रस्ता क्रॉस करताना पांढर्‍या रंगाच्या टेम्पो वाहन चालविणार्‍या चालकाने बेजबाबदार व वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत चित्रलेखा यांना धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात टेम्पोचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून,भोसरी एमआयडीसी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.