Bhosari Crime News : कंपनीच्या स्टोअर रूमचा पत्रा उचकटून पाऊण लाखांचा माल लंपास

एमपीसी न्यूज – कंपनीमधील स्टोअर रूमच्या छताचा पत्रा उचकटून 74,000 हजारांचा माल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शेवाळे सेंटर परिसरात घडली.

याविरोधात सतिश रतन सौदागर(वय 34 रा. भैरवनाथ मंदिर, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात शनिवार (दि. 9) रोजी फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फि र्यादी यांच्या पिंपरी येथील शेवाळे सेंटर परिसरातील बीटमॅपर इंटिग्रेशन टेक्नॉलॉजी कंपनीतील स्टोअर रूमचे छत उचकटून 6000 रुपये चे अ‍ॅल्युमिनीअम प्लेट, 68000 रुपये केबल असे एकुण 74000 रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने दि. 2 ते 4 एप्रिल दरम्यान चोरून नेला.

याची माहिती कामगार सचिन साळवी यांनी फि र्यादीस फोनद्वारे दिली. फिर्यादी व वरिष्ठ व्यवस्थापक विनायक कुलकर्णी यांनी पाहणी केली. पिंपरी पोलीस करीत असून यासंदर्भात आरोपीला अटक झालेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.