Bhosari Crime News : ट्रकच्या धडकेत दुचाकी चालक ठार

एमपीसी न्यूज – ट्रकच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. आहार हॉटेलसमोर, स्वामी समर्थ मंदीराजवळ, नाशिक रोड भोसरी येथे 08 मार्च 2022 रोजी रात्री नऊ वाजता हा अपघात झाला.

मुकुंद पाचारणे (वय 48, रा. कुरळी, खेड) असे अपघातात मरण पावलेल्या इसमाचे नाव आहे. त्यांचा मुलगा तेजस पाचारणे (वय 20) यांनी याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून एचआर 47 डी 9149 या ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकुंद पाचारणे हे शुक्रवारी त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 14 जेटी 6536) पुणे ते कुरळी प्रवास करीत होते. रात्री नऊ वाजता आहार हॉटेलसमोर, स्वामी समर्थ मंदीराजवळ आल्यावर त्यांच्या दुचाकीला एचआर 47 डी 9149 या ट्रकने धडक दिली. यामध्ये पाचारणे यांना दुखापत झाली व त्यांचा मृत्यू झाला. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.