Pimple Gurav Crime News : चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून 5.62 कोटी रूपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून 5.62 कोटी रूपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पिंपळे गुरव येथील दाम्पत्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सप्टेंबर 2020 ते 09 एप्रिल 2022 या कालावधीत पिंपळे गुरव येथे ही घटना घडली.

नारायण रघुनाथ चिघळीकर (वय 52, रा. गुरूद्वारा चौक, चिंचवड) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून राहुल जयप्रकाश गायकवाड व निवेदिता राहुल गायकवाड (दोघेही रा. पिंपळे गुरव) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना व इतर लोकांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून 5.62 कोटी रूपयांची फसवणूक केली. असे फिर्यादित म्हटले आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.