Sangvi : मोटार पार्क करताना मध्ये आला म्हणून झालेल्या वादावादीत सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून केले जखमी

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरुन सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारुन एकाला गंभीर जखमी केले. ही घटना पिंपळे गुरव मधील शिवनेरी कॉलनीत शुक्रवारी (दि. 4) रात्री अकराच्या सुमारास घडली.

संदिप दत्तात्रय देवकर (वय 27, रा. शिवनेरी कॉलनी, साठ फुटी रोड, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ॠषीकेश सरतापे, कुणाल सरतापे, रोहित सरतापे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप हे कॉलनीजवळ मोटार पार्क करीत होते. त्यावेळी त्या मोटारीच्या समोर आरोपी ॠषीकेश अचानकपणे आला. त्यावेळी संदीप यांनी मोटारीचा हॉर्न वाजवून त्याला बाजूला होण्यास सांगितले. त्या कारणावरुन दोघांमध्ये वादावादी झाली. ‘तु इथला भाई आहेस का’, असे म्हणून ऋषिकेश याने संदीप यांना धमकावले. तसेच, संदीप यांना मारण्यासाठी कुणाल आणि रोहित या दोघा भावडांना त्याने बोलावून घेतले. त्यानंतर शिवीगाळ करुन संदीप यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारुन गंभीर जखमी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.