Pune : सिगरेट पिणे तरुणाला पडले महागात

खोटी कथा रचून 50 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – चारचाकीत सिगारेट पिणा-या तरुणाला खोटी कथा रचून केली 50 हजारांची फसवणुक केल्याची घटना शनिवारी (दि.6) दूपारी साडेतीनच्या सुमारास वानवडी येथील रिलायन्स मार्टच्या समोर घडली. याप्रकरणी आशुतोष भोसले(वय 24, रा.धनकवडी) याने फिर्याद दिली आहे व 40 वर्षीय इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका अनोळखी इसमाने येऊन एक तयार केलेली खोटी कथा सांगितली की, तुम्ही चारचाकीत बसून सिगारेट पिऊन त्याची राख खिडकीतून टाकल्यामुळे ती राख माझ्या डोळ्यात गेल्याने माझा तोल गेला. त्यामुळे माझी बायको दूचाकीवरून खाली पडली. मी तिला रुग्णालयात नेले असून तिच्या उपचाराला 70 ते 80 हजार रूपये खर्च आहे. त्यानंतर त्या इसमाने फिर्यादीला मारहाण करून माझ्या बायकोच्या गर्भातील बाळाला काही झाल्यास तुला जाळून टाकेल अशी धमकी दिली व फिर्यादीकडून 50 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. फिर्यादीला आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.