Bhosari Crime News : कंपनीचा पत्रा उचकटून एक लाख रुपये किंमतीचे एमएस व तांब्याचे बार चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीचा पत्रा उचकटून जवळपास एक लाख रुपये किंमतीचे एमएस व तांब्याचे बार चोरीला गेले आहेत. 1 ते 4 फेब्रुवारी 2022 दरम्यान राजमाने स्टेनलेस स्टील फिटींग्ज, एम आय डी सी भोसरी येथे हा चोरीचा प्रकार घडला.

आप्पासाहेब बाबुराव राजमाने (वय 63, रा. पिंपरी) यांनी याबाबत भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या राजमाने स्टेनलेस स्टील फिटींग्ज या कंपनीचा पत्रा उचकटून एमएस व तांब्याचे बार चोरीला गेले आहेत. यामध्ये 80 हजार रुपये किंमतीचे 400 एमएस बार व 17,500 रुपये किंमतीचे 35 किलो तांब्याचे बार यांचा समावेश आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, भोसरी एम आय डी सी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.