Maval : महिलांसाठी आयोजित मोफत व्यावसायिक प्रशिक्षण शिबिराचा समारोप

मोरया महिला प्रतिष्ठान वडगाव मावळ व मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

एमपीसी न्यूज – मोरया महिला प्रतिष्ठान वडगाव मावळ व मॅजिक बस इंडिया फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सबलीकरणासाठी दहा दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शंभर महिलांना कागदी पिशव्या बनविणे, केक बनविणे, साड्यांना गोंडे लावणे, इमिटेशन ज्वेलेरी बनविणे, बेसीक ब्युटी पार्लर यांचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा समारोप कार्यक्रम वडगाव येथे पार पडला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव नगरपंचायतीच्या CEO सुवर्णा ओघले-शिंदे मॅडम, इनरव्हील क्लब तळेगांव दाभाडेच्या अध्यक्षा वैशाली जामखेडकर, सेक्रेटरी सुनिता काळोखे, आदिती सोरटे, स्मिता रोकडे तसेच वडगांव मावळचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरसेविका शारदा ढोरे, नगरसेविका पूजा वाहिले, नगरसेविका पूनम जाधव, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा चेतना ढोरे, कांचनताई ढोरे, सुनीता ढोरे, हुमेरा मोमीन, स्नेहल पाटील, पायल ढोरे, मॅजिक बसचे तालुका समन्वयक राहुल आरे, रीसोर्स पर्सन सुमित दहितुले, सुषमा हेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रशिक्षक सोनाली मोरे, प्रतिक्षा गट, ज्योती सुगराले, कविता नकाते, नैना भोसले, जान्हवी ढोरे यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी प्रशिक्षणार्थी महिला उषा सोळंकी, प्रियांका कुडे, ज्योती आगळे, पूजा ढोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयुर ढोरे यांनी प्रशिक्षण शिबिर राबविल्याबद्दल त्यांचे आभार मानले. प्रशिक्षण पार पाडण्यासाठी मॅजिक बसचे समुदाय समन्वयक पौर्णिमा कचरे, आरती ओव्हाळ, अर्चना भालेराव यांनी मदत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.