Vadgaon : मोरया महिला प्रतिष्ठानच्या श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् जप व हळदी कुंकू समारंभास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने पुरूषोत्तम मासानिमित्त वडगाव (Vadgaon ) शहरातील महिला भगिनींसाठी श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् जप व हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास सुमारे तीन हजार पेक्षा अधिक महिलांनी उपस्थिती दर्शवत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
वडगाव शहरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या उपस्थितीत श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रांचे हजारों जपनाम करण्यात आले. याप्रसंगी शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे सदस्य आणि भक्तगणांचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, नगराध्यक्ष मयूर ढोरे, मावळ तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा दिपाली गराडे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेविका पूनम जाधव,माया चव्हाण,प्रमिला बाफना,पुजात वहिले, वैशाली कुडे, सुनिता ढोरे, सुप्रिया वाघमारे,प्रियंका खैरे,मोरया महिला प्रतिष्ठान उपाध्यक्षा चेतना ढोरे, कार्याध्यक्षा प्रतिक्षा गट, जयश्री जेरतागी, सुषमा जाजू यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् जपांचा धार्मिक कार्यक्रम सरतेशेवटी हळदीकुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मोरया महिला प्रतिष्ठानच्या सर्व संचालिका, सदस्या आणि शहरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनींचे मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली मयूर ढोरे आभार (Vadgaon ) मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.