Talegaon Dabhade : रोटरी सिटीतर्फे ‘वसुंधरा वंदन’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीच्या वतीने तळेगाव दाभाडे येथील नवीन समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात वसुंधरा वंदन या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.  भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाची सांगता विविध उपक्रमांच्या माध्यमातून देशभर संपन्न होत आहे. त्यातील वसुंधरा वंदन या उपक्रमांतर्गत नवीन समर्थ विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

Pcmc : मास्टर माईंड इंग्लिश मीडियम ग्लोबल स्कूल मध्ये 76 वा स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीच्या वतीने तळेगाव दाभाडे येथील स्वातंत्र्यपूर्व 117 वर्षांपूर्वी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील चतुर्सूत्रीपैकी राष्ट्रीय शिक्षण या प्रधान उद्दिष्टाने स्थापन झालेल्या नवीन समर्थ विद्यालय या शाळेच्या परिसरात वसुंधरा वंदन या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण भारत वर्षामध्ये मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा झाला. या आपल्या देशाच्या अमृत महोत्सवाचा सांगता समारंभ विविध उपक्रमांच्या माध्यमातून देशभर संपन्न होत आहे.

त्यातील वसुंधरा वंदन या उपक्रमांतर्गत नवीन समर्थ विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स या ठिकाणी रोटरी सिटीचे अध्यक्ष सुरेश शेंडे,संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे,सेक्रेटरी भगवान शिंदे, प्रकल्प प्रमुख प्रदीप टेकवडे,शालेय समिती अध्यक्ष महेशभाई शहा, तानाजी मराठे, विश्वास कदम, प्राचार्य वासंती काळोखे व विद्यार्थी व शिक्षक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

वसुंधरा वंदन समारंभ पूर्वक शालेय प्रांगणात करण्यात आले.सुरेश शेंडे, विलास काळोखे,प्रदीप टेकवडे,  भगवान शिंदे यांनी पर्यावरणाचे महत्त्व मनोगताद्वारे विशद केले महेश भाई शहा व वासंती काळोखे यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभा काळे यांनी केले प्रास्ताविक वासंती काळोखे यांनी तर आभार पर्यवेक्षक रेवाप्पा शितोळे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.