Ayodhya Mandir : अयोध्येतील राममंदिराचे बांधकाम तीन वर्षांत पूर्ण होणार

प्रकल्पाचा बांधकाम खर्च 1100 कोटींहुन अधिक

एमपीसी न्यूज : अयोध्येतील भव्य राममंदिर उभारणीच्या प्रकल्पाला गती मिळाली आहे. कोटय़वधी हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले प्रभू रामचंद्र यांच्या मंदिराचे बांधकाम जवळपास तीन वर्षांत पूर्ण होईल. प्रकल्पाचा बांधकाम खर्च 1100 कोटींच्या पुढे जाईल, अशी माहिती रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे खजिनदार स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी रविवारी दिली.

मुख्य मंदिराचे बांधकाम तीन ते साडेतीन वर्षांत पूर्ण होईल व त्यावर साधारण 300 ते 400 कोटी रुपये इतका खर्च येईल. संपूर्ण 70 एकर जमिनीवरील प्रकल्पावर 1100 कोटींहून अधिक खर्च येईल.

प्रकल्पातील तज्ञांशी सल्लामसलत करून हा अंदाजे खर्च गृहीत धरला आहे, असे स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी स्पष्ट केले. प्रकल्पावरील खर्चासाठी पैसे गोळा करण्यासाठी 6.5 लाख गावे व 15 कोटी घरांपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दान देण्यासाठी तयार असतील, तर मी मातोश्रीवरही जाईन. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱहे यांनी आम्हाला एक किलो चांदीची वीट दिली आहे, असे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.