Pune : चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – एका अज्ञात चारचाकी वाहन चालकाने दुचाकीस्वारास धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना दि. 2 ऑगस्ट रात्री 8.30  वाजण्याच्या सुमारास वानवडी येथे घडली.

या प्रकरणी निलेश नाईक यांनी फिर्याद दिली. गौस कासम पिंजारी, (वय 67, गुरुवार पेठ ) आपल्या मोटारसायकलवरून जात असताना एका अज्ञात चारचाकी वाहन चालकाने गोळीबार मैदान ते स्वारगेटकडे जाणा-या रोडवर पिंजारी यांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये पिंजारी यांचा मृत्यू झाला. अपघाताच्या ठिकाणी आरोपी न थांबता फरार झाला. पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.