Pune : ध्यान व योगाचे महापालिकेच्या विद्यार्थ्यांना महत्व पटवून द्यावे – प्रवीण चोरबेले

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये एकाग्रता यावी व मन शांत रहावे, यासाठी २० मिनिटे ध्यान आणि योगाचे महत्व पटवून द्यावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रविण चोरबेले यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे. 

ध्यान व योगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अभ्यासामध्ये मन लागेल. त्यामुळे विचार करण्याची क्षमता वाढेल. शाळेची शैक्षणिक प्रगती पट वाढण्यास मदत होईल, याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या क्रीडा समितीच्या बैठकीत मान्य झाला आहे. याची अंमलबजावणी महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये करण्यात यावी, असेही चोरबेले म्हणाले. महापालिका आयुक्तांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.