Pune : लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2 प्रवाश्यांकडे आढळली जिवंत काडतुसे

एमपीसी न्यूज – पुणे विमानतळावरून आज ( गुरुवारी ) पहाटे दोन प्रावाश्यांच्या बॅगेज मधून 24 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत . हे दोन्ही प्रवाशी बंगळूर आणि दिल्ली येथे जाण्याच्या तयारीत होते .या दोन्ही प्रवाशांना विमानतळ पोलिसांच्या ताब्यात सोपविण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप पाटील (वय 58) हे आज पहाटे 5 :30 वाजताच्या स्पाईस जेट विमानाने बंगळुरूला जाण्यासाठी निघाले  होते. यावेळी सुरक्षरक्षकांनी केलेल्या तपासणीत त्यांच्या बॅगेत 22 जिवंत काडतुसे आढळून आली . पोलिसांनी अधिक चौकशी केली असता , दिलीप पाटील यांच्याकडे 32 कॅलिबर पिस्टलचे लायसन्स असून ते घाईगडबडीत हि काडतुसे बॅगेतून काढायचे विसरले असे त्यांनी सांगितले .

तर दुसऱ्या एका घटनेत सिंग नामक 60 वर्षीय इसमाच्या बॅगेत दोन 9 एमएमची जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली . सिंग हे मूळचे दिल्लीचे राहणारे असून ते वाघोली येथे राहणाऱ्या त्यांच्या मुलाकडे आले होते. आज पहाटे ते इंडिगोच्या विमानाने दिल्लीला जाण्यासाठी निघाले होते. तपासणी करताना सुरक्षा यंत्रणांना त्यांच्या बॅगेत दोन काडतुसे आढळली. त्यानंतर विमानतळ कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. परंतु सिंग यांच्याकडे परवाना नसून , हि काडतुसे त्यांच्या बॅग मध्ये कशी आली हे माहित नसल्याचे सिंग यांनी सांगितले . हि काडतुसे बॅगेत कशी आली याविषयी सिंग यांच्यासह त्यांच्या मुलाशी आणि नातेवाईकांची चौकशी करत आहेत .

अधिक तपासात,सिंग हे जिवंत काडतुसे त्यांच्या बॅग मध्ये कशी आली आणि परवाना सादर करू शकले नाहीत तर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी सांगितले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.