BNR-HDR-TOP-Mobile

Pune : धायरी परिसरात बॉम्ब सदृश्य वस्तू

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – गुरुवारी दुपारी 2 च्या सुमारास पुणे महानगरपालिका कचरा वेचक कर्मचाऱ्यांना धायरी , दळवीवाडी परिसरात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली . हि माहिती कर्मचाऱ्यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर पोलीस पथक आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले .दरम्यान धायरी परिसरात जिवंत बॉम्ब आढळून आल्याची अफवा पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते . परंतु हे केवळ बॉम्बचे आवरण असून त्याचा कोणताही धोका नसल्याचे सिहंगड पोलिसांनी स्पष्ट केले . अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत . 

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.