Talegaon : चालकाचे नियंत्रण सुटल्याने मिनीबस पलटी; चालकाचा मृत्यू

The minibus overturned as the driver lost control, death of driver.

एमपीसी न्यूज – मिनीबस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. यामध्ये चालकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात 31 ऑगस्ट रोजी दुपारी पावणे सहा वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गावाजवळ झाला.

रामदास भिकू जठार (वय 52, रा. जायगाव, ता. खटाव, जि. सातारा) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी मयत चालकाच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक तुकाराम साबळे यांनी फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत बस चालक रामदास जठार हे एक मिनीबस घेऊन मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येत होते. ओझर्डे गावाजवळ आल्यानंतर त्यांचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावर पलटी झाली.

यामध्ये जठार हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.