Talegaon Dabhade News : राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्षांवर शुभेच्छांचा वर्षाव; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी मोठ्या फरकाने जिंकण्याचा विश्वास

एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते गणेश खांडगे यांची निवड झाली. या निवडीबद्दल सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयदेव गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष विकी लोखंडे, उद्योजक महेश निंबाळकर, विशाल लोखंडे यांनी अभिनंदन केले तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी मोठ्या फरकाने जिंकेल असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.

तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते गणेश खांडगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यासाठी तळेगाव दाभाडे येथे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयदेव गायकवाड आले होते. त्याप्रसंगी बोलत होते.

आमदार जयदेव गायकवाड म्हणाले की, आमदार सुनील शेळके,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश खांडगे, यांच्या नेतृत्वात संपूर्ण मावळ तालुका जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुका मोठ्या फरकाने जिंकतील असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला व पुढील पक्षवाढीसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.